जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२३
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन व वृक्षरोपण करण्यात आले सुरुवातीला जिल्हाध्यक्ष लीना पवार व शहराध्यक्ष मनीषा पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. तसेच कांचन पाटील, सुचिता पाटील यांनी जिजाऊ वंदना म्हटली.
डॉ जयश्री भोसले यांनी अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट उलगडून दाखविला. त्यानंतर अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले यात कडुलिंब, पिंपळ, चिंच, आवळा, बेहडा ,करंज, जांभूळ, शिसम ही वृक्ष लावण्यात आली.
सूत्रसंचालन मीनाक्षी पाटील यांनी तर आभार अर्चना पाटील यांनी मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष लीना पवार, शहराध्यक्ष मनिषा पाटील, कार्याध्यक्ष सुचिता पाटील , मिनाक्षी पाटील सचिव कांचन पाटील,डॉ जयश्री देवरे, चारुशीला पाटील, अर्चना पाटील, नीता वानखेडकर, आशा मौर्य, विजया पांडे, वंदना मंडावरे, रामकृष्ण पाटील व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते