जळगाव मिरर / ९ मार्च २०२३
राज्यात आज मनसेचा सतराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन येथे मनसेच्या वतीने सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
कार्यक्रमामध्ये राज ठाकरे म्हणाले की, कोणतीही सत्ता नसतांना महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांमध्ये जी ऊर्जा त्यामुळे त्यांचे आभार. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात ते म्हणाले की, ज्याने केलंय त्याला पहिलांदा समजेल त्याने केलंय मग इतरांना कळेल. मनसेच्या मागील १७ वर्षांच्या कामाचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. पक्ष कुठल्या परिस्थितीतून गेला कुठल्या परिस्थितीतून जातोय, हे पाहाणं गरजेचं आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, काही जण सोडून गेले हे खरंय, परंतु ते एक एकटे गेले. एकत्रित नाही गेले. जे लोक म्हणतात, मनसेचा एकच आमदार आहे त्यांना सांगतो, १३ आमदार निवडून आले ते सोरटवरती आले होते का?
भाजपबद्दल बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांची भरती सुरुय. आहोटी येणार. भरती-ओहोटी येतच असते. राजू पाटील हे एकटे आपल्या पक्षाची बाजू मांडत आहेत, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आजपर्यंत आपण एकही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. तरीही काही लोक टीका करतात. भाजपने जाहीरनाम्यात दिलं होतं, टोलमुक्त महाराष्ट्र करु..पण एकही पत्रकार त्यांना विचारत नाही. आम्ही काय केलं, हे जनतेला माहिती आहे. या कार्यक्रमादरम्यान मनसेच्या कामाबद्दलच्या एका पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. मनसेने केलेल्या कामाची माहिती या पुस्तकामध्ये आहे. मनसेने नाशिमध्ये केलेल्या कामाचा पाढाच राज यांनी वाचला.