• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

शरद पवारांचा इशारा : भाजपला अनेक धक्के बसणार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 5, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
शरद पवारांचा इशारा : भाजपला अनेक धक्के बसणार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२४

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून भाजपमध्ये अनेक नेते पक्ष प्रवेश करीत आहे तर दुसरीकडे भाजपला रामराम करीत काही शरद पवारांची तुतारी हाती घेत आहे. यात हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आणि ही सुरुवात आहे. यापुढेही यापुढेही भाजपला अनेक धक्के बसतील असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत शरद पवारांनी भाजपला 2 झटके दिले आहेत. कागलमध्ये समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनीही तुतारी हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला. वडगाव शेरीचे भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारेंनीही पवारांचा हात पकडलाय. चंदगडचे भाजप नेते शिवाजी पाटीलही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. अकोलेत मधुकरराव पिचड आणि वैभव पिचडही शरद पवारांकडे परतणार असल्याची चर्चा आहे.

ज्या ठिकाणी शिंदेंची शिवसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सीट जाणार, त्या मतदारसंघाचे भाजपचे इच्छुक नेते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे आणि तशी सुरुवातही झाल्याचं दिसतं आहे. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, हर्षवर्धन पाटलांनी आधी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि नंतर पत्रकार परिषदेत तुतारी हाती घेणार असल्याचं पाटलांनी जाहीर केलं. 6 किंवा 7 तारखेला इंदापुरात कार्यकर्त्यांचा भव्य मेळाव्यात हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे..मात्र भाजपला सोडण्याचा निर्णय फडणवीसांशी बोलूनच घेतल्याचंही हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीआधी हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपात आले होते..त्यामुळं त्यावेळी अवघ्या 3100 मतांनी राष्ट्रवादीच्या दत्ता मामा भरणेंकडून पराभव झाला…आता तेच भरणे मामा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असून त्यांच्याशीच हर्षवर्धन पाटलांचा दुसऱ्यांदा सामना होईल.

आता हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडून शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतल्यानं 2 वर्षांआधीचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय…ज्यात भाजपात आल्यानं शांत झोप लागते…चौकशी बिवकशी काही नाही, असं हर्षवर्धन म्हणाले होते..त्यामुळं आता पवारांकडे आल्यावर शांत झोप लागेल का ? या प्रश्नावर पाटलांनी नो कमेंट्स म्हटलं. अद्याप निवडणुकीची घोषणा आणि महायुती तसंच महाविकास आघाडीचं जागा वाटपही झालेलं नाही. त्यामुळं इनकमिंग आणि आऊटगोईंगची जोरदार इनिंग सुरु झालेली नाही. मात्र भाजपला अनेक धक्के बसतील हे पवारांनी सूचकपणे सांगितलं आहे.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group