• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

शेतकऱ्यांच्या शेती साहित्यावर लावलेला जीएसटी काढू : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आश्वासन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 24, 2024
in जळगाव
0
उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुतीचे दोन्ही उमेदवार उद्या गुरुवारी अर्ज दाखल करणार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२४

महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, यामुळे आगामी काळात दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांच्या मालावर आणि अवजारांवर लावलेला १२ ते २४ टक्के जीएसटी काढून टाकू अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज जळगाव मध्ये बोलताना केली. रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवतीर्थ मैदानावर जमलेल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सजवलेल्या बैलगाडी व ट्रॅक्टरमधून श्रीराम पाटील आणि करण पाटील या दोन उमेदवारांसह मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड, उमेदवार श्रीराम पाटील, करण पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, प्रसेनजीत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री पाटील पुढे म्हणाले की,रावेर लोकसभा मतदार संघातून श्रीराम पाटील आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष फोडल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात दूध संघ शेतकऱ्यांना केवळ २४ रुपये लिटरचा भाव देतो. मात्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ३४ ते ३५ रुपये लिटरचा भाव दुधाला मिळतो. शेतमालाला कमी भाव देऊन शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

हुकूमशाही उलथवून टाका : राऊत

खासदार संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीत भारतीय जनता पक्षावर तोफ डागली. दरवर्षी दीड कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा करून हे सरकार सत्तेवर आले. मात्र दरवर्षी दीड लाख लोकांनाही युवकांनाही रोजगार दिला नाही. गद्दारी करून सत्तेवर आलेल्या या पक्षाला निष्ठावंतांची ताकद दाखवा व हुकूमशाही उलथून टाका. श्रीराम पाटील आणि करण पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम पाटील यांच्यावर पक्षांतराचा आरोप करणाऱ्यांवर टीका केली. भारतीय जनता पक्षाचे इतके मोठे कार्यालय इथे उभे राहिले, हा इतका पैसा कुठून आणला? असा प्रश्न विचारून शेतकरी हितासाठी कर्जमाफी करणाऱ्या शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले. रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूक आता जनतेने हाती घेतली असून जनता आता विरोधकांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.

Tags: #jalgaonkaran pawarMahavikas Aghadishriram patil

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group