जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३
जगभरात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर होत आहे. वयोवृद्धापासून ते बालकापर्यंत स्मार्टफोन वापरत आहे. लहान मूल शांत राहावे म्हणून अनेक पालक त्याच्या हातात मोबाईल देऊन आपली कामे करीत असतात पण अशातच एका धक्कादायक घटना समोर आली आहे. याच स्मार्टफोनमुले आठ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला आहे.फोन वापरताना हातात फोनचा स्फोट झाल्याने मुलाचा जीव गेला. दरम्यान आता या दुर्दैवी प्रकारानंतर या भीषण घटनेवर शाओमी कंपनीची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.
८ वर्ष वय असलेली आदित्यश्री ही दुर्घटनेच्या वेळी फोनवर व्हिडीओ पाहात होती. ही घटना २४ एप्रिल रोजी केरळच्या त्रिस्सूरमध्ये रात्री १०.३० वाजता घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार मुलीच्या हातात होता तो स्मार्टफोन Redmi Note 5 Pro होता. फॉरेंसिक एक्सपर्ट्सनुसार स्फोट झाला तेव्हा फोन चार्ज होत नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार चिमुरडी खूप जास्त वेळापासून फोनमध्ये व्हिडीओ पाहत होती आणि फोन ओव्हरहीट झाल्याने फोनचा स्फोट झाला. हा स्फोट मुलीसाठी जीवघेणा ठरला. फॉरेंसिक टीमने या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल स्थानिक पोलिसांना दिला आहे आणि अधिकच्या तपासासाठी घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तूंची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदिश्रीच्या चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या होता. तर हाताला देखील गंभीर इजा झाली होती.
मुलीचे वडिल अशोक कुमार यांनी सांगितेल की, ही घटना जेव्हा घडली तेव्हा त्यांची मुलगी तीच्या आजीसोबत घरी होती. आजीने पोलीसांना सांगितले की, मुलगी पांघरून घेऊन आतमध्ये मोबाईलवर गेम खेळत होती. तर त्या स्वयंपाकघरात जेवन घेऊन येण्याकरिता गेल्या होत्या. तेव्हा त्यांना स्फोटाचा आवाज ऐकू आला, त्यांनी जाऊन पाहिलं तर त्यांची नात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या दरम्यान ब्लास्ट फोनमध्ये खूप वेळापर्यंत व्हिडीओ पाहिल्याने झाला असेही सांगितले जात आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाओमी कंपनीने म्हटले आहे की, शाओमी इंडिया ही कंपनीसाठी ग्राहकांची सुरक्षितता सर्वोतपरी आहे आणि आम्ही या प्रकाराची गंभीरतेने दखल घेतली आहे. या कठीण प्रसंगात आम्ही कुटुंबासमवेत आहोत आणि त्यांना शक्य ती मदत करण्यात येईल. सध्या या प्रकरणचा तपास सुरू असून या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आधिकाऱ्याच्या मदतीने काम सुरू आहे. तसेच त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.