जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५
शहरातील शिवकॉलनी जवळील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचन नगरात राहणाऱ्या महिला ह्या दुचाकीने सोमवारी ६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता शिवकॉलनीतील राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एमएच २० डीई ५८१३) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार घेतल्यानंतर त्यांचे पती अजयकुमार पंजाबराव पाटील यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे ह्या करीत आहे.