जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२४
जळगाव शहरापासून नजीक असलेल्या नितीन साहित्य नगर परिसरात सात ते आठ वर्षापासून साडेचारशे पाचशे परिवारासह महानगरपालिकेच्या हद्दीत वार्ड क्रमांक १९ मध्ये नागरिक वास्तव्यास असून याठिकाणी हा परिसर अंधारमय होता. यासाठी मनसेने मनपाला निवेदन देवून आंदोलन देखील केले होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून या परिसरात उजेड पडू लागला आहे.
मिळालेल्या महितिन्सुअर, जळगाव शहरापासून नजीक असलेल्या नितीन साहित्य नगर परिसरात अनेक वर्षापासून रस्त्यावर अंधार होता. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताची संख्या वाढत होती. या बाबत मनसेच्या पदाधिकारीकडे तक्रार आली असतान त्यांनी लागलीच मनपाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन देखील केले. अखेर या प्रभागात उजेड पडू लागल्याने परिसरातील नागरिकांनी मनसेचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, आशिष सपकाळे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे यांचे आभार मानत कौतुक देखील केले आहे.