जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच खान्देशात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको कारच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहितीसमोर आली आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पिकअप वाहनाचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या भीषण अपघात जखमी झालेल्या प्रवाशांवर धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कार आणि व्हॅनची ही धडक इतकी भयंकर होती की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.