• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2026
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जून २०२६ 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांच्या कथित बंडखोरीच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याभोवती घडणाऱ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षातील मतभेद आणि संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने ओमराजे यांची मनधरणी करण्यासाठी मध्यरात्री पुण्यात गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कथित बंडखोर खासदारांपैकी काही जण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याच्या चर्चा सुरू असताना, खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आपल्या निवासस्थानी आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ते पुण्यात परतले असून, त्यांनी अद्याप कोणताही अंतिम राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा करून पुढील दोन ते तीन दिवसांत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ओमराजे यांना पक्षात कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटाने प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केल्याचे दिसून आले. ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी मध्यरात्री पुण्यातील ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट अत्यंत गोपनीय पद्धतीने झाल्याची चर्चा असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, ओमराजे निंबाळकर यांची भूमिका सध्याच्या परिस्थितीत अत्यंत निर्णायक ठरू शकते. जर ठाकरे गटाला त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले, तर कथित बंडखोर गटाचे संख्याबळ कमी होऊ शकते. त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडून ओमराजे यांना पक्षातच कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे.

या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, “पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल निंबाळकर कुटुंबाच्या अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीने भेट दिली. ओमदादा हे पक्षाचे ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी पक्षाकडून आमदार आणि तीन वेळा खासदार म्हणून काम केले आहे. अनेक विषयांवर आमची चर्चा झाली, मात्र प्रत्येक गोष्ट सार्वजनिक करण्याची गरज नसते.”

ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील भूमिकेकडे आता केवळ धाराशिवच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group