जळगाव मिरर | २३ मे २०२३
भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील जैन मंदिराजवळील लिंबू मार्केट येथे सेंट्रिंग प्लेटचे पैसे मागितल्यावरून प्राणघातक हल्ला चढवत जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप प्रकाश लवंगे याने आरोपी आकाश ऊर्फ चॅम्पियन श्याम इंगळे (२१) याला बांधकामाच्या सेंट्रिंग प्लेटचे दोन हजार रुपये मागितले. याचा राग येऊन चॅम्पियनने लवंगी व त्याच्या भावाला शिवीगाळ करून त्याच्या घरातून चाकू आणून संतोष लवंगे याच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुस्लीम कॉलनीत लपल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सोपनि हरीश भोये, नीलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्या पथकाला पाचारण करत त्याला अटक केली.