
जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२४
भुसावळ शहरातील चांदमारी चाळ परिसरात राहणाऱ्या तरूणाचा राहत्या घरात मयतस्थितीत कुजेलला मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी दुपारी आढळून आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाचे नाव अजय बाबुराव सोनवणे (वय-३५) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चांदमारी चाळ परिसरात अजय बाबुराव सोनवणे हा तरूण एकटाच वास्तव्याला होता. अजय हा आपल्या घरात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून घरीच होता. दरम्यान शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शेजारी राहणाऱ्यांना घरातून वास येत असल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीसांना माहिती देण्यात आली. घराचा दरवाजा उघडताच त्याचा मयतस्थितीत मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे समोर आलेले नाही.