जळगाव मिरर | २ सप्टेबर २०२४
चोपडा तालुक्यातील अडावद येथील पाटचारीवरील रहिवासी असलेल्या जगदीश फिंगऱ्या बारेला (वय ४०) या शेतमजूराला बेदम मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीत त्याचा खून झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी श्वासन पथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. या घटनेमुळे गावात खळबळ माजून गेली असून पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर बऱ्हाणपुर महामार्गावर असलेल्या पीर पाखर बाबा दर्गाजवळ जगदिश बारेला या तरुणाचा मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास मिळून आला. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाची तपासणी केली असता, त्याला मारहाण करण्यात आली असून त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. ठसे तज्ञ सहायक पोलीस निरीक्षक श्री.फड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनरीक्षक गणेश वाघमारे, अनिल जाधव, हवालदार निलेश झोपे, पोलीस नाईक प्रशांत कंखरे हे उपस्थित होते. श्वानाने दर्गाचा परिसरात शोध घेतला. मात्र त्याला कुठलाही सुगावा मिळत नसल्याने संशयिताचा शोध घेण्यास अपयश आले. मृतदेहाच्या प्राथमिक स्थितीवरून त्याला झालेला जबर मारहाण करूनच त्याचा खून करण्यात आला असल्याचे समजते. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खून झालेला मयत जगदिश फिंगऱ्या बारेला हा हतनुरच्या उजव्या कालव्यावरील डाव्या चारीवर झोपडीत राहत होता. शेतमजूरी करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून तपास कामी सूचना दिल्यात. यावेळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनरीक्षक राजू थोरात, हवालदार भरत नाईक, दिनेश चव्हाण, गृह रक्षक दलाचे जवान संजय पवार, अमोल हिवाळे, चंदू कोळी, मनोज महाजन, किरण महाजन यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला.