मेष- नवीन शिकण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना काम मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराच्या सुशोभीकरणाकडे लक्ष द्याल. त्यात बराच वेळ जाईल.
वृषभ- भावंडांसाठी वेळ द्यावा लागेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. घरात काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काहींना प्रवास करावा लागेल.
मिथुन- भावंडांशी काही कारणाने वाद होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. त्यात तुमचा फायदा होईल; पण व्यवहार जपून करा. काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. संयम सोडू नका.
कर्क- तुमच्या समोरील किरकोळ स्वरुपाच्या अडचणी दूर होतील. फावला वेळ मिळेल. मात्र, निष्कारण होणाऱ्या वादापासून दूर राहा जीवनसाथीशी सूर जुळेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. मुलांना चांगल्या संधी मिळतील. मात्र, त्यांचा ताण वाढवू नका.
सिंह- किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील, चैन, मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल. पैशाचे पाकीट, मोबाइल, महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. ऑनलाइन व्यवहार करताना खबरदारी घ्या. ओटीपी, पासवर्ड इत्यादी माहिती कुणालाही सांगू नका.
कन्या- ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाची कामे पार पडतील. मात्र, त्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात कष्ट करावे लागतील. मनात थोडी धाकधूक वाटत राहील. नोकरीत दगदग होईल. सहकारी मित्रांशी कठोर संभाषण टाळा.
तूळ – नोकरीत नवीन कामे उपस्थित होतील. त्यामुळे तुम्हाला फावला वेळ मिळणार नाही. घरी पाहुणे मंडळी येतील. त्यामुळे महिलावर्गाची लगबग सुरु राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.
वृश्चिक- किरकोळ स्वरुपाच्या अडचणी दूर होतील. स्वतःसाठी वेळ काढणे शक्य होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीत कामाचा ताण राहील. काही कारणाने धावपळ करावी लागू शकते. प्रवास घडून येईल.
धनु- सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. तब्येतीची काळजी घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. फार दगदग करू नका.
मकर- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू प्राप्त होतील. मौजमजा करण्याच्या नादात आरोग्याची हेळसांड करू नका. स्वतःची कामे वेळच्या वेळी पूर्ण करा. शिस्त पाळा.
कुंभ- विरोधकांच्या हॉलचाली सुरू राहतील. मात्र, आपण त्यांना पुरुन उराल. तोंडपूजेपणा करणाऱ्या लोकांसमवेत वेळ वाया घालवू नका, तसेच तुमची महत्त्वाची माहिती इतरांना सांगत बसू नका. नाही तर महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. शांत चित्ताने कामे करा.
मीन – सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. लोक तुमच्याशी गोड बोलून तुमच्याकडून त्यांची कामे करून घेतील. जवळच्या लोकांसाठी वेळ देणे आवश्यक आहे. जीवनसाथीची काळजी घ्या.