जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२४
जिल्ह्यातील नगरदेवळा येथील पहिलीची विद्यार्थिनी काव्या राहुल मणियार (वय ७) ही ११ सप्टेंबरला दुपारी शाळेतून घरी आली. त्यानंतर घराच्या अंगणात बहिण अन् भावंडांसोबत खेळत असताना तिला विषारी जातीच्या सर्पाने दंश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच तिला तातडीने भडगाव येथील खासगी रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही ते काव्यास वाचवू शकले नाहीत. दरम्यान, गुरुवार दुपारी १२ वाजता अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. या दुर्दैवी घटनेबाबत संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.