जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२४
पारोळा तालुक्यातील हिरापूर येथील ३८ वर्षीय शेतकऱ्यावर वाढते कर्ज व सततच्या नापिकी व अति पावसामुळे यंदाचेही उत्पन्न हातातून निसटल्यासारखे झाल्याने कर्ज कसे फिटेल या चिंतेतून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील हिरापूर येथील महेंद्र विनायक सोनवणे (वय ३८) यांनी दि.२२ रोजी सकाळी नऊ वाजता घरी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते. दुपारपर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी सर्वत्र परिसरात शोधा शोध केले असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास हिरापूर शिवारातील दत्तात्रे झावरू पाटील यांच्या विहिरीजवळ त्यांच्या चपला काढलेल्या आढळून आल्या. यावेळी गावातील हीलाल श्रावण भील, अशोक रुमाल भील यांनी विहिरीत उतरून त्याला मृत अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले कर्जातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची समजले, त्यांच्याकडे दोन बिघे जमीन आहे.
त्यात यंदा कापसाच्या पिकाची लागवड केली होती परंतु अति पावसामुळे पीक खराब अवस्थेत होते त्यातच गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी काढलेले देना बँक मधील पीक कर्ज भरण्याची नोटीस आलेली होती सततच्या नापिकी व येणाऱ्या उत्पन्नाचा सोर्स नसल्याने व हात उसनवार व सरकारी बँकांचे झालेले कर्ज कसे फेडावे या चिंतेतून त्यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या परिवारातील सदस्यांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा दि.२३ रोजी सकाळी दहा वाजता हिरापूर येथे निघणार आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात दिनेश पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.