जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील अनेक परिसरात चोरी व घरफोडीच्या घटना नेहमीच घडत असतांना नुकतेच शहरातील भिकमचंद नगरातील एका घरातून दागिन्यासह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भिकमचंद नगर परिसरातील घर क्र.१२२ याठिकाणी सागर अनिल कुरकुरे(वय ३३) हे वास्तव्यास असून दि.३० नोव्हेबर ते ३ डिसेंबर या दरम्यान बंद घर असतांना अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर ५ हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.