जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२४
बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेणारया महिलेसह तिच्या साथीदारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक लाख रुपयांची रोकड आणि चार लाख रुपयांचा धनादेश हस्तगत करण्यात आला. ही घटना शनिवार दि. ७ स्पटेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच शहरातील एकाकडे केलेली अधिक रकमेची मागणी पूर्ण न झाल्याने धमकी देणाऱ्या दुसऱ्या एका महिलेलादेखील पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५५ वर्षीय ट्रान्सपोर्ट व्यावसायीक वास्तव्यास आहे. त्यांची हॉटेल चालक असलेले वकील उखा राठोड (वय ३०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) यांच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर नंतर हॉटेल चालक उखा राठोड याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची एका महिले सोबत ओळख करून दिली. त्यानंतर व्यावसायिकाचे महिलेच्या सहमतीने शरीरसंबंध निर्माण झाले. त्याबदल्यात ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाने त्या महिलेला पैसेही दिले होते. मात्र काही दिवसांनी महिलेने काही ना काही कारणासाठी पैशांची करीत होती. त्यानुसार वेळोवेळी त्या ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाने महिलेला १० हजार रुपये रोख तर ६१ हजार रुपये असे एकूण ७१ हजार ५०० रुपये दिले होते. तर महिलेसोबत ओळख करुन देणाऱ्या हॉटेल चालक वकील उखा राठोड याला १५ हजार रुपये दिले होते.