जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील विद्यावर्धिनी शिक्षणसंस्था संचालित प्रोग्रेसिव्ह इग्लिश मिडीयम व प्रगती विद्यामंदीर शाळेत स्व. अशोक प्रल्हाद नारखे स्मृतीप्रित्यर्थ क्रिडासप्ताह उत्साहात झाला.
या क्रीडा स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेस प्रेमचंदजी ओसवाल, मंगलाताई दुनाखे सचिन दुनाखे , मनिषा पाटील, श्रध्दा दुनाखे, योगिता गोहील, विजया चवरे, ज्योती कुलकर्णी, सुषमा थोरात यांचे मार्गदर्शन लाभले तर क्रीडा शिक्षक – नेहा पवार, सविता खडसे, रिटा पाटील, सारीका पाटील, सुभाष शिरसाठ, रमेश ससाणे, मनोज भालेराव, दिपाली वैद्य यांनी परिश्रम घेतले.