जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२३
राज्यातील एका न्यायाधीशाच्या दालनात आरोपी वर गोळीबार झाल्याचा थरार न्यायाधीशांसह वकिलांसह पोलिसांनी अनुभवला आहे. हि घटना सातारा जिल्ह्यातील वाई येथे घडल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, वाई येथील भर कोर्टात न्यायाधीशांच्या दालनासमोर एका आरोपीवर गोळीबार झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून याप्रकरणी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे. वाई न्यायालयात मौक्का गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगार अनिकेत नारायण जाधव यांच्यासह दोन साथीदारांवर हा गोळीबार झाल्याचे समजते. कोर्टात दबा धरून असलेल्या एका आरोपींना हा गोळीबार केला असल्याचेही वृत्त आहे. कोल्हापूरच्या कळबा मध्यवर्ती कारागृहात बंटी जाधव असताना त्यांना वाईमध्ये एका हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणी मागितली होती त्यामुळे वाई पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी कडबा कारागृहात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तसेच त्यांना आज वाई कोर्टात आणले असता कोर्टात दाबा धरून बसलेल्या एका आरोपींना बंटी जाधव सह त्याच्या दोन साथीदारांवर गोळीबार केला आहे.
या आरोपींवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून एका आरोपीला पोलिसांना पकडण्यात यश आलं आहे. या थरारक घटनेत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार न्यायाधीशांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोरच घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी पोलिसांच्या हवाल्यानं दिली आहे.