जळगाव मिरर | २५ जुलै २०२४
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात उकाडा असल्याने त्यासाठी पावसाळ्यात अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. त्यामुळे जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून देखील जळगावात रामानंद घाटात शेकडो वृक्षाचे रोपण करण्यात आले आहे.
शहरातील रामानंद घाटात आज दि. २५ जुलै रोजी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचे हस्ते या परिसरातील ५० झाडे लावून त्याची निगा राखण्यासाठी डॉ.सोनवणे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच रामानंद घाटातील वृक्षारोपणाचा उपक्रम गेल्या पाच वर्षांपूर्वी श्रीधर नगर मधील नागरिक व योगशिक्षक सुनील गुरव यांचे अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाचा उपक्रमाची सुरुवात झालेली असून आतापर्यंत या परिसरात गुरव सर व परिसरातील नागरिकांनी 300च्या वर झाडे लावलेली आहे. आज सुद्धा श्री सुनील गुरव व परिसरातील नागरिक यांचे सहकार्याने हा उपक्रम सुरू आहे श्री जगन्नाथ निंभोरे यांच्याकडून घाटातील संपूर्ण झाडांना पाईपलाईनच्या सहाय्याने पाणी पुरविले जाते व श्री किरण दहाड यांचे कडून पूर्ण झाडांसाठी थिबक सिंचनची पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आलेली आहे.
तसेच या उपक्रमासाठी विशेष सहकार्य जळगाव जिल्हा बीजेपी सरचिटणीस सौ ज्योती निंभोरे यांचे तसेच श्रीधर नगर व परिसरातील श्री मोहन महाजन श्री चिंधू नारखेडे , रत्नदिप टेंट हाऊस चे संचालक श्री महेश खडके तसेच वाघ नगर येथील व जिजाऊ नगरचे वृक्षप्रेमी श्रीं विजयेंद्र साळुंखे , योगेश पाटील, मनोज साळवेकर तसेच श्री प्रभाकर बोरसे सौ रेणुका हिंगु सौ पूर्वी सोनी , सौ अश्विनी बिर्हाडे , श्री भागवत सपकाळ या सर्वांनी वृक्षारोपण कार्यक्रमाला मदत केली माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांचा सत्कार योग शिक्षक श्री सुनील गुरव, श्री मोहन महाजन , सौ ज्योती निंभोरे व सर्व नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नागरिकांना आववाहन करण्यात आले की ज्यांना वृक्षारोपण कार्यक्रम राबवायचा आहे त्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी त्या ठिकाणी येऊन वरील टीम वृक्षारोपण करतील, हा कार्यक्रम राबवण्यासाठी रामानंद घाटात श्री जगन्नाथ निंभोरे यांच्याशी संपर्क साधावा असे योगशिक्षक श्री सुनील गुरव कळवतात, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन योग शिक्षक सुनील गुरव यांनी केले.