जळगाव मिरर | २९ जुलै २०२४
भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस तर्फे रविवारी २८ जुलै रोजी जागतिक प्रकृती संवर्धन दिनानिमित्त नियोजित असलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम जळगाव शहरातील सावता नगर निमखेडी येथील स्वामी पार्क व महादेव मंदिर परिसर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे नियोजन जळगाव भावसार समाज जिल्हाध्यक्ष श्री.प्रवीण सीताराम भावसार यांनी केले होते. यामुळे भावसार समाजाची एकात्मता निर्माण झाली.एक नवीनच कार्यक्रम भावसार समाज बांधवां मार्फत करण्यात आले असल्याकारणाने सर्वत्र कौतुक होत आहे. आज जागतिक निसर्ग दिवसाच्या निमित्ताने जळगाव येथील जिल्हा सामान्य रुगणालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर साहेब यांच्या शुभ हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
आज 30 वृक्ष लागवड केली असून त्यात पिंपळ, कडुनिंब वटवृक्ष चिंच कवठ बेल आवला आंबा कदंब करंज असे विविध प्रकारचे वृक्ष आहेत. फक्त फोटो पुरते वृक्षारोपण न करता पुढील वर्षी या झाडांचा वाढ दिवस साजरा करण्याचा संकल्प करून प्रत्येकाने वृक्ष लागवड करून झाडांचे संगोपन करावे असे मार्गदर्शन करताना जिल्हा आरोग्याधिकारी श्री. डॉ.सचिन बाहेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. श्री.वसंत पाटील म.न.पा. अधिकारी यांनी देखील आपल्या मनोगतात वृक्ष लागवड महत्व वर्णन केले.
या प्रसंगी पृथ्वीराज भावसार, गणेश भावसार ,प्रवीण भावसार, गिरीष रमणलाल भावसार,महेंद्र भावसार अर्जुन दादा चौधरी संजय कुमावत सर मोहन पाटील ,सागर संधांशिव, प्रतापसिंग परदेशी हेमंत पाटील रजुभाऊ वाघ राजेंद्र बडगुजर शिवाजी सोनार मधुकर पाटील या सर्व समाजबांधवांच्या विशेष उपस्थिती होती व सर्व वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतली. आजचा वृक्ष संवर्धन कार्यक्रम यशस्वीरीत्या सदर कार्यक्रम पार पाडला. असे प्रसिद्धी प्रमुख श्री गिरीष रमणलाल भावसार यांनी कळविले