जळगाव मिरर | २२ मे २०२५
भुसावळ येथे नातेवाईकांकडे कार्यक्र मासाठी आला ल्यT जालन्यातील मामा-भाच्याचा तापी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास राहुल नगराकडील घाटावर घडली. याबाबत भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ शहरातील मामाची टॉकीज जवळील पेंढारवाडा येथे संदीप हरिश्चंद्र रणधीर यांच्या घरी देवाच्या कार्यक्रमासाठी मामा रामराजे नंदलाल नाटेकर (वय ४७) आणि भाचा आर्यन गाळे (वय १८) हे आलेले होते. बुधवारी २१ मे रोजी सकाळी भुसावळ शहरातील नदीपत्रात अंघोळीसाठी मामा रामराजे नाटेकर आणि आर्यन काळे हे गेले होते. दरम्यान आंघोळ करत असताना त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते दोघेही पाण्यात बुडाले दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ) परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन दोघांना पाण्याबाहेर काढले. आणि भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन चौधरी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या दोघांचा जालना येथे अंत्यविधी होणार असल्याची नातेवाईकांकडून माहिती मिळाली. पुढील तपास भुसावळ शहर पोलिस स्टेशन करीत आहे.




















