जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२४
भुसावळ शहरात गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली. सुमित मनोहर पवार असे या तरूणाचे नाव आहे. नॉर्थ रेल्वे कॉलनी भागात गाडीतून पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पिस्तूलासह ताब्यात घेत त्याच्याकडून ६ लाख ५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हयात साजरा होत असलेल्या गणपती उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सुचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळ शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पो.हे.कॉ. कमलाकर भालचंद्र बागुल, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. संघपाल राजाराम तायडे, पो.ना.कॉ. प्रविण पुंडलीक भालेराव, पो.कॉ. सचिन पोळ हे पेट्रोलिंग करीत होते. यादम्यान सुमित पवार हा तरूण गाडीत एक गावठी पिस्तूल ठेवून फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार शहरातील नॉर्थ रेल्वे कॉलनी भागातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.