जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजप व ठाकरे गटात वाक्ययुद्ध सुरु झाले आहे. नुकतेच भाजपचे नेते नारायण राणे यांनी आता थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे म्हणाले कि, “काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल.” अशा शब्दात यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “उद्धव ठाकरे यांची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात व लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. माननीय नरेंद्र मोदीजी अनेक निवडणूकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उदभवत नाही. माननीय नरेंद्रजी मोदींबद्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही.
नारायण राणे पुढे लिहतात, “राजकारणातील माणसे षंड आहेत असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो.आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते.”