अमळनेर : विक्की उत्तम जाधव
एकीकडे विधानसभेचे अधिवेशन गाजविणारे आमदार अनिल भाईदास पाटील हे आपल्या मतदारसंघात विकास कामात देखील मागे नसून त्यांच्या प्रयत्नांनी दहिवद येथील विविध गावासाठी 2 कोटींची पाणीपूरवठा योजना मंजूर झाल्याने या योजनेसह इतर विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला…!
मोठी पाणीपुरवठा योजना देऊन आमदारांनी पाण्याचा प्रश्न सोडविल्याने ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार वाजतगाजत स्वागत करून जंगी सत्कार केला.यावेळी आमदारांनी शेतकऱ्यांची मांडत या शासनाने कापूस व इतर धान्य उत्पादक शेतकऱ्यांची पीडा ओळखावी अशी अपेक्षा व्यक्त करत, महाविकास आघाडीच शेतकऱ्यांची तारणहार असल्याचे सांगितले आणि या गावासाठी आवश्यक तेवढा निधी कायम देत राहील अशी ग्वाही दिली.यावेळी एल टी नाना पाटील, माजी उपसरपंच प्रविण काशिनाथ माळी, चेअरमन नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद जयवंत गुलाबराव पाटील, चेअरमन विकासो ईश्वर गिरधर माळी, व्हा.चेअरमन नवभारत माध्यमिक विद्यालय दत्तात्रय किसन पाटील, गोकुळ गबा माळी, उपाध्यक्ष क्षत्रीय काच माळी समाज शिवाजी काशिनाथ माळी, सुभाष हिम्मतराव पाटील, व्हा चेअरमन विकास सोसायटी रणजित पाटील, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अनिल भटा माळी, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, बाळू पाटील,वर्षा पाटील, आशाबाई माळी, मालुबाई माळी, वैशाली माळी, पंकज पाटील, सुकलाल काळू पारधी, बापू गोविंदा सोनवणे, छबीलाल रामदास पाटील, निबा परशुराम पाटील, किशोर जाधव, अशोक माणिक पाटील, अशोक साहेबराव पवार, गुलाब ताराचंद पाटील, प्रशांत भदाणे, ज्ञानेश्वर देसले, भिला बाबुराव माळी, विक्रम माळी, शिवाजी रतन पाटील, दगडू सीताराम माळी, भगवान सिताराम माळी, जगदीश देसले, निलेश पवार, ईकबाल खाटीक, राजेंद्र रुपचंद पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रभारी सरपंच देवानंद बहारे, सूत्रसंचालन टी एस महाजन सर, आभार शिवाजी पारधी यांनी मानले.
या विकास कामांचे झाले भूमीपूजन
सामाजिक न्याय विभाग रस्ता कॉक्रिटीकरण रक्कम 5.00 लक्ष, 3054-2419 अंतर्गत रा.मा.15 ते दहिवद रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण रक्कम 50.00 लक्ष, आमदार निधी 2021-22 अंतर्गत चौक सुशोभिकरण (आहिल्यादेवी होळकर स्मारक)- रक्कम 3.00 लक्ष, MREGS अंतर्गत गावा रस्ता कॉक्रीटीकरण रक्कम 30.00 लक्ष, जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा रक्कम 2 कोटी 10 लक्ष असे एकूण 2 कोटी 98 लक्षच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.