• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

स्व:ताला पेटवून घेणाऱ्या प्रियकराचा मृत्यू ; लाख रुपये केले होते प्रेयसीवर खर्च…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 22, 2022
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
स्व:ताला पेटवून घेणाऱ्या प्रियकराचा मृत्यू ; लाख रुपये केले होते प्रेयसीवर खर्च…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २२ नोव्हेबर २०२२

प्रेमाच्या आहारी गेल्याने टोकाचे पाऊल उचलत गजाननने स्वत:सह संशोधक मैत्रीण पूजा साळवे (२८, रा. दहेगाव, ता. सिल्लोड) हिला पेटवून आयुष्याची राखरांगोळी केली व कुटुंबीयांच्या स्वप्नांवर पाणी फेरले.सोमवारी दुपारी २.१५ वाजता गजाननने पूजाच्या कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापिकेसमक्ष स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले व पूजालाही कवेत घेतले. यात गजानन ९५ टक्के, तर पूजाही ४० टक्के भाजली. रात्री उशिरा गजाननचा मृत्यू झाला, तर पूजावर उपचार सुरू आहेत.

जिंतूर तालुक्यातील दाभादिग्रस या छोट्याशा गावातून आलेला गजानन खुशाल मुंडे (३०) पीएचडी करत होता. विद्यापीठ वसतिगृहात राहायचा. गावातील सर्वात हुशार मुलगा. कुटुंबीयांनी पोटाला चिमटा देऊन शिकायला शहरात पाठवले. सहा महिन्यांपूर्वीच स्पोर्ट्स बाइक घेऊन घेऊन दिली. आपला मुलगा ‘डॉक्टर’ होऊन चांगली नोकरी करेल, घराण्याचे नाव उज्ज्वल करेल, अशी स्वप्ने शेतकरी आई-वडील रंगवत होते.

‘पूजाने माझ्याशी लग्न केले, नंतर विश्वासघात केला. मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले. असे असतानासुद्धा ती माझ्यासोबत राहत नाही. मला टाळते. पोलिसांकडे तक्रार केली. माझ्या खऱ्या प्रेमाला ती ओळखू शकली नाही. आता आपणही जगायचे नाही अन‌् तिलाही जिवंत ठेवणार नाही असा निर्णय घेत हे पाऊल मी उचलले,’ असा जबाब गंभीर भाजलेल्या गजाननने पोलिसांना दिला.
पूजा व गजानन दोघेही जीवभौतिकशास्त्र या एकाच विषयात पीएचडी करतात. गुणवत्तेच्या आधारे दोघांनाही फेलाेशिप मिळणार होती. असे असताना गजाननने उचललेले हे टोकाचे पाऊल मित्रांना आणि प्राध्यापकांना धक्का देणारे ठरले. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा व गजानन या दोघांमध्ये आधी मैत्री होती, पण काही महिन्यांपासून बिनसले होते. गजानन हुशार होता. त्याने इतर विषयांत लक्ष न देता संशोधकावर लक्ष केंद्रित करावे यासाठी प्राध्यापकांनी त्याची समजूतही काढली होती. मी सगळं विसरलो आहे, असे तो सगळ्यांना सांगायचा. पण कायम टेन्शनमध्ये असायचा. काही दिवसांपूर्वी त्याने ‘ओळखीचा चांगला वकील आहे का?’ अशी विचारणा एका मित्राकडे केली होती. याच मानसिक तणावातून त्याने विद्यापीठ परिसरात यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
४० टक्के भाजलेल्या अवस्थेतील पूजाचा पोलिसांनी जबाब घेतला. तिने सांगितले, ‘माझी इच्छा नसताना गजानन पाठलाग करायचा. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी वारंवार त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने एकले नाही. त्यामुळे मी पोलिस ठाण्यात गेले.’ दरम्यान, पूजाच्या नातेवाइकांनी रात्री उशिरा बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. कलम ३०७ नुसार यात गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. शेतकरी कुटुंबातून आलेली पूजाही सहा बहिणीत सर्वात हुशार आहे. पीएचडी झाल्यानंतर तिला प्राध्यापकाची नोकरी लावण्यासाठी मी मंत्री अब्दुल सत्तार यांना विनंती देखील केली होती, असे तिच्या आईने हंबरडा फोडून सांगितले.

मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपली गाडी होस्टेलवर लावून गजानन मित्राच्या दुचाकीवर पूजाच्या कॉलेजमध्ये गेला होता. सोबत एक पिशवीही होती. पंपावर बाटलीत पेट्राेल दिले जात नाही. त्यामुळे त्याने आपल्या दुचाकीतून दोन बाटल्या भरून पेट्रोल काढले असावे, टाकी रिकामी झाल्यामुळे मित्राच्या दुचाकीवर त्यान पूजाचे कॉलेज गाठले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. पूजाने पोलिसांत तक्रार दिल्यापासून गजानन जास्तच अस्वस्थ होता. इकडे पोलिस त्याच्यावर कारवाई करेपर्यंत तू कॉलेजला जाऊ नको, असे पूजाच्या कुटुंबीयांनी तिला सांगितले होते. पूजाला पाच बहिणी आहेत. तिचे वडील देखील शेतकरी होतेे. मात्र काही महिन्यांपूर्वीच ते वारले. मोठा भाऊ शेती करतो. तिच्या आईलाही मुलीकडून खूप अपेक्षा होत्या.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group