• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

उद्या शिवतीर्थावर कुणाकुणाचा नंबर?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 1, 2022
in ब्रेकिंग, राज्य
0
उद्या शिवतीर्थावर कुणाकुणाचा नंबर?
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था
गेली दोन वर्ष राज्यावर कोरोनाचं भीषण संकट होतं. या संकटसमयी सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधन लादली होती. मात्र आता कोरोनाची लाट ओसरत असताना राज्य सरकारने सगळे निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. गुढीपाडव्याला मनसेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. याच मेळाव्यात राज ठाकरे शिवतीर्थावर ‘खास पिक्चर’ दाखवणार आहेत. उद्या ठाकरे कुणाचा पिक्चर शिवतीर्थावर दिसणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
गुडी पाडवा मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येतेय.शिवतीर्थावरची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ९ मार्चला पुण्यात मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जोरदार समाचार घेतला होता. त्यांच्या नकलाही केल्या होत्या. तसंच निवडणुका पुढे ढकलण्यावरुन सरकारवर तोफ डागली होती. त्यावेळी हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो २ एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन” असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं.
कोरोनाकाळात राज्य सरकारने केलेलं काम, सरकारकडून झालेल्या चुका, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा लागलेला चौकशीचा ससेमिरा, ईडीच्या धाडी, महाविकास आघाडी भाजपमधला कलगीतुला, गृहमंत्रिपदावरुन सेना राष्ट्रवादीतलं तू तू मै मैं, अशा अनेक विषयांवर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. तसंच महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने उद्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे मनसैनिकांना चार्ज करतील.
कोश्यारी, राऊतांनंतर आता कुणाकुणाचा नंबर?
मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी तत्कालिन प्रसंगानुरुप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर ठाकरी आसूड ओढले. राऊत कॅमेरे सुरु झाले की नाटकीपणाने बोलतात असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. आता वेगळा आवाज काढायची स्टाईलच झालीय, सध्या सकाळी टीव्ही लावला की ते संजय राऊत येतात, काय ते राऊत,किती बोलतात, कसं बोलतात…? बोलणं हा मुद्दा नाहीय, पण काय बोलावं, कसं बोलावं”, असं म्हणत त्यांनी राऊतांवर टोलेबाजी केली.
कोश्यारी यांनी रामदास स्वामी आणि शिवयारांच्या नात्यावर भाष्य केलं होतं. तसंच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या विवाहावर देखील मिश्किल कमेंट केली होती. या सगळ्यावरुन राज ठाकरे राज्यपालांवर बरसले. ‘तुम्हाला काय कळतं का? शिवाजी महाराज, रामदास स्वामी….आपला काय संबंध नसताना काहीही बोलून जायचं. शिवाजी महाराजांनी कधीही सांगितलं नाही की रामदास स्वामी माझे गुरू आहेत, ना रामदास स्वामींनी सांगितलं शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडलं.
तर राज्यपालांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते, “त्यावेळी लहान वयात लग्न व्हायची. तसं सावित्रीमाईंचं आणि ज्योतिबांचं झालं. बोलताना जरा भान बाळगा. त्यांचं त्या वयात लग्न झालं होतं. पण तुमचं तर आणखी झालं नाही…”
उद्याच्या पाडवा मेळाव्यात आता राज ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असेल? राज ठाकरे उद्या कुणावर ठाकरी तोफ डागणार? याकडे मनसैनिकांसह राज्याचं लक्ष लागलंय.

Related Posts

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !
जळगाव

जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !

February 24, 2026
धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !
क्राईम

धक्कादायक : ‘हसू झालंय माझं ग’ म्हणत घेतला टोकाचा निर्णय : २२ वर्षीय विवाहितेने लिहिली हातावर सुसाईड नोट !

February 22, 2026
सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू
क्राईम

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चेन्नईतील गोल्डन बीचवर महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू

February 22, 2026
जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार
क्राईम

जपानमध्ये भारताचा झेंडा फडकवणाऱ्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा केंद्रीय मंत्री खडसेंच्या हस्ते सत्कार

February 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

February 25, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

February 25, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !

जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !

February 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group