जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. यात आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राणे म्हणाले कि, उद्धव ठाकरे याचं डोकं ठिकाणावर नाही, म्हणून देशाच्या नेत्यांवर खंडणीखोर म्हणून टीका करत आहे. कोण खंडणी घेत होता, कुठल्या रूममध्ये घेत होता याचा साक्षीदार मी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आयुष्यभर खंडणी मागण्याचं काम केलं, बाकी यांचा काही उद्योगधंदा नाही. जे 40 आमदार सोडून गेले ते पोच करत होते, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, हिंदुत्व, अभिमान, त्याग करणारे बाळासाहेब असली होते. नकली म्हणजे, विकला जाणारा उद्धव ठाकरे, वडिलांच्या नावावर कर्तृत्व मिळवणारे उद्धव ठाकरे अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
नारायण राणे म्हणाले की, एवढा घाणेरडा माणूस मी पाहिला नाही. उद्धव ठाकरे यांनी एक फोन करायचे तीन लाख रुपये घेतले, एवढा घाणेरडा माणूस मी पाहिला नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर भेकड अशी टीका केली. नारायण राणेंनी यावर उत्तर शब्दात देऊन उपयोग नाही, तसा आवाज काढावा लागेल, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना कुठलीही नोटीस आली की, मोदींच्या दारी सरेंडर व्हायचे. सुशांत सिंह आणि दिशा सालियान केसमध्ये किती तरी वेळा भेटले ते विसरले. यांच्या डोक्यावर परिमाण झाला नाहीतर अस बोलणार नाही. काहीही बोलतो, ते भोगावं लागेल, असंही राणेंनी म्हटलं आहे. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, तिथे उद्धव ठाकरे गुडघे टेकायला जातात. उद्धव ठाकरे यांचे पाच खासदार आणि मोदींवर टीका करतात, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.