• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 15, 2026
in Uncategorized
0
भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच !
Share on FacebookShare on Twitter

समाजातील सर्वच क्षेत्रांतील घटकांनी महाशोभायात्रेत सहभागाचे मान्यवरांचे आवाहन

जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२६

आपला परमपवित्र भारत देश कृषीप्रधान आहे. गेली कित्येक वर्षे आपण सुजलाम्‌‍- सुफलाम्‌‍ स्थितीची अनुभूती घेतली आहे. मात्र, काही वर्षांपासून किंबहुना सद्यःस्थितीत देशातील शेती, शेतकरी, शेतमजूर व कृषी उत्पन्न आदींची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. आपल्या पूर्वजांनी पिढ्यान्‌‍ पिढ्या सेंद्रीय व सकस शेती केल्याने ते कायम सुदृढ होते. त्यामुळे देशातील कृषी क्षेत्रास पुनर्वैैभव व निरामयता प्राप्त करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांनी भूमी सुपोषण चळवळ जनजागरासाठी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. त्या अनुषंगाने बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात काढण्यात येणाऱ्या महाशोभायात्रेत समाजातील सर्वच क्षेत्रांतील घटक व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विविध मान्यवरांनी केले.

येथील श्री मंगळग्रह मंदिरात ‌‘माझा संकल्प-भूमी सुपोषण‌’ चळवळ जनजागरण महाशोभायात्रेच्या आयोजन-नियोजनासंदर्भात रविवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. त्यात महाशोभायात्रेतील सहभाग, मार्ग, जनजागृतीपर घोषवाक्य आदींबाबत चर्चा करण्यात आली. आमदार अनिलदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबरावदादा पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडे, जितेंद्र जैन, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, ओम शांती परिवाराच्या विद्यादीदी व आरतीदीदी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर होते. बैठकीस आजी-माजी नगरसेवक, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, महिला बचत गट, अनेक गावांतील सरपंच-उपसरपंचांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी भूमी सुपोषण चळवळ काय आहे? याविषयीची सविस्तर माहिती दिली. 18 फेब्रुवारी रोजी निघणाऱ्या महाशोभायात्रेचे स्वरूप सांगितले. तसेच 19 मार्च 2026 रोजी वर्षप्रतिपदा आहे. हा दिवस भूमी मातेचा जन्मदिवस असतो. आपल्या श्री मंगळग्रह मंदिरात भूमी माता व भूमिपुत्र श्री मंगळग्रह देवता यांच्या मूर्ती असल्याने देशव्यापी चळवळीचा प्रारंभ अमळनेर येथून होत आहे. शेतकऱ्यांनी मोठा सहभाग नोफ्लदवून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा ः खासदार स्मिताताई वाघ
अती उत्पन्न घेण्याच्या नादात जमिनीचा कस जात आहे. पेस्टिसाइड्स, रासायनिक खतांमुळे सकस आहार मिळत नाही. युरियापासून दूध बनविले जात आहे. आपण खाणार काय? महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे. त्यामुळे आपल्यालाच आता चांगली सुरूवात करायची आहे. अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरातून जागतिक स्तरावरील संस्थेच्या भूमी सुपोषण चळवळ जनजागराची सुरूवात होते, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वच घटकांनी महाशोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मात्र, पुढचा टप्पाही खूप महत्त्वाचा आहे. याचे सूक्ष्म नियोजन आपल्याला सर्वांना करावयाचे आहे. 19 मार्च 2026 रोजी होणाऱ्या भूमी सुपोषण कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

अमळनेरचे नाव देशपातळीवर पोहोचावे ः आमदार अनिलदादा पाटील
भूमी सुपोषण जनजागर चळवळीची सुरूवात श्री मंगळग्रह मंदिरातून होत आहे, याचा अभिमान आणि अत्यानंद आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. महाशोभायात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोफ्लदवावा. सरपंच, विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण भागाचा कणा आहे. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जाईल. यासाठी आपल्या पक्ष कार्यालयातून ग्रामीण भागातील संस्थांशी आमचे कार्यकर्ते संपर्क साधतील. शेतकऱ्यांशीही संवाद साधतील. भूमी सुपोषण जनजागरण चळवळीच्या या देशव्यापी कार्यक्रमासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अमळनेरच नाही तर धुळे व जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सहभागासाठी विशेष नियोजन केले जाईल. भूमी सुपोषण ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. हा कार्यक्रम यशस्वी करून अमळनेरचे नाव देशपातळीवर पोहोचवावे.

कार्यक्रम अभूतपूर्व करावा ः माजी आमदार कृषिभूषण साहेबरावदादा पाटील
मातीचे सुपोषण नसल्याने आपण कुपोषित होत चाललो आहोत. आपल्याला जे काही मिळते ते भूमी मातेतूनच अर्थात शेतीतून मिळते. चांगले जे येते ते मातीतूनच येते. भूमीला मातेचा दर्जा देण्यात यावा. मंगळग्रह सेवा संस्थेने भूमी सुपोषण जनजागर चळवळीचे विधायक कार्य हाती घेतले आहे. यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. भूमीची सेवा करण्याची मला संधी मिळते, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी भूमी सुपोषण जनजागर चळवळीसाठी केलेले सूक्ष्म नियोजन कौतुकास्पद आहे. 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशोभायात्रेत सर्वच घटकांनी सहभागी होऊन जनजागृती करावी. तसेच 19 मार्चचा कार्यक्रम अभूतपूर्व करावा.

स्मृती (स्व.) अजितदादांच्या..!
श्री मंगळग्र्रह मंदिराला केवळ (स्व.) अजितदादांच्या सांगण्यावरूनच 15 एकर जागा मिळाली आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अजितदादांच्या उपकारांची जाणीव असल्याने मंदिर परिसरात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काहीतरी करण्याची योजना तयार आहे.

Related Posts

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध  गुन्हा दाखल!
Uncategorized

जळगावातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता कुंटणखाना; महिलेसह पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल!

May 24, 2026
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कामे? नियम धाब्यावर; चौकशीची मागणी
Uncategorized

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कामे? नियम धाब्यावर; चौकशीची मागणी

May 20, 2026
रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !
Uncategorized

रात्रीच्या अंधारात हरवलेला मुलगा; टीसीच्या तत्परतेने आईच्या स्वाधीन !

May 11, 2026
अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी
Uncategorized

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी

May 8, 2026
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !
Uncategorized

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !

April 27, 2026
वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !
Uncategorized

वडीलकीच्या नात्याला काळिमा : मावशाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group