जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३ ।
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नावासह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी ताब्यात घेतल्यानंतर आता विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा आता शिंदे गटाने घेतला आहे. यामुळे ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट शिंदे गटातील आमदारांनी घेतली होती. यावेळी विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय आम्हाला मिळावं अशी मागणी या आमदारांनी केली होती. त्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद आणि इतर आमदारांनी कार्यालयाचा ताबा घेतला आहे. यावेळी शिवसेनेच्या इतर कार्यालयांचा ताबा देखील घेण्याचा कायदेशीर प्रयत्न आम्ही करणार आहोत असे गोगावले यांनी सांगितले. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे येत्या २७ तारखेला सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने टाकलेलं हे पहीलं पाऊल असल्याचे बोलले जात आहे.