जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
देशात गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणत चढ उतार दिसत असतांना ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज सोन्या-चांदीचे भाव कोसळले आहेत. पितृपक्षाचा काळ सुरु झाला असून या काळात दर घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सप्टेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात पडझड पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरल्याने सोन्याचे भाव घसरले आहे. शनिवारी (30 सप्टेंबर) ला मुंबईत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात २२ कॅरेटसाठी ३३० रुपयांनी घसरण झाली होती. आज किती पैसे मोजावे लागणार जाणून घेऊया.
ड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,३५० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,३५० रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,३३५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,१९० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात २४ कॅरेटनुसार १६० रुपयांनी घसरण झाली आहे. गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १० ग्रॅमसाठी ७३५ रुपयांनी होता तर आज १० ग्रॅमसाठी ७३० रुपये मोजावे लागणार आहे. चांदीच्या भावात प्रति किलोने ५०० रुपयांनी घट झाली आहे.