जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३ ।
देशात वाढती महागाई बघता विरोधक नेहमीच यावर आंदोलने करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे राज्यात लग्नसराई सुरु असतांना सोन्याच्या दारात देखील वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५६,२१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७७,३५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७७,३५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,२१० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६१,३२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,२१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,३२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,२१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,३२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,२४० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,३५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७७३.५० रुपये आहे.