जळगाव मिरर | २१ जुलै २०२३
जळगाव शहरात शिक्षणासाठी आलेल्या २१ वर्षीय मुलीस एका तरुणाने पळवून नेत मध्यप्रदेशातील काही शहरातील हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील एका परिसरात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून २१ वर्षीय तरुणी जळगावात राहाण्यासाठी आली असताना दिनांक ३ जून रोजी तरुणाने मुलीला पळवून नेत मध्यप्रदेशातील इंदोर, प्रीतमपुर या शहरात वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जात तिच्या कुटुंबीयांना व तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्याशी वारंवार जबरदस्ती अत्याचार केल्याप्रकरणी तरुणीने जळगाव तालुका पोलीस स्थानकात तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे करीत आहे.