जळगाव मिरर | १९ जुलै २०२४
छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या कारची रस्ता दुभाजकाची धडक बसल्याने कार रस्त्याच्या कडेला झेपावली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली असली तरी पूल परिसरातील अपघातांची मालिका सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनानंतर महामार्ग प्राधिकरण झोपेतून खाडकन जागे झाले असून युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे . याच कामामुळे सध्या शनि महाराज मंदिरासमोरील चौकात भुलभुलय्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळेच छत्रपती संभाजी नगर कडून जळगाव कडे जाणाऱ्या एम.एच.१९ डी.व्ही. ८८८७ हेअर टाटा कारची रस्ता दुभाजकाला धडक बसल्याने सदर कार पुढे झेपावली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून वेगावर नियंत्रण मिळवत तीस फूट खोल खड्ड्यात जाण्यापासून कारला वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली . अपघात ग्रस्त कार काढताना महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पहूर पोलिसांचे सहकार्य लाभले.