जळगाव मिरर | १८ जुलै २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना त्याच बरोबर अल्पवयीन मुली व विवाहितेवर देखील अत्याचाराच्या घटना घडत असतात, नुकतेच खारघर येथील एका २७ वर्षीय तरुणी सोबत इंस्टाग्रामवर मैत्रीचे संबंध जुळवून तिचा नग्न व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ मित्र, नातेवाईक यांना पाठवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याप्रकरणी रेहान खान नामक इसमाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 78, 351 (दोन), 308 (दोन) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, 66 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पीडित तरुणीला इन्टाग्राम आयडीवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती एक्सेप्ट केल्यानंतर ते दोघे चॅटिंग करू लागले. त्यांनी त्याचे नाव रेहान खान असे सांगून तो युके देशात राहतो असे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले. त्यानंतर एकमेकांना व्हाट्सअप नंबर शेअर केल्यानंतर ते चॅटिंग करू लागले.
15 जुलै रोजी रेहानने पीडित तरुणीला व्हिडिओ कॉल केला. यावेळी त्याने तो व्हिडिओ रेकॉर्ड केला. 16 जुलै रोजी युके देशातून कपडे, ज्वेलरी व मेकअपचे सामान पाठवले आहे ते उद्या भारतात आल्यानंतर टॅक्स पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्या गोष्टीला नकार दिल्याने तुझी लाईफ आता बरबाद करतो असे बोलून 20 हजारांची मागणी केली. त्याला नकार दिला त्यावेळी नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केला असून पैसे दिले नाहीस तर व्हिडिओ नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना पाठवून बदनामी करेन अशी धमकी दिली. यावेळी त्याने अश्लिल व्हिडिओ पीडित तरुणीला पाठवला. व्हिडिओ व्हायरल करू नको असे सांगितले असता त्याने वारंवार पैशांसाठी फोन, मेसेज करू लागला. पैसे न पाठवल्याने रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ मित्र, नातेवाईक यांना व्हाट्सअप द्वारे पाठवून दिला. या प्रकाराने वैतागलेल्या युवतीने पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली.