जळगाव मिरर | २९ जुलै २०२३
राज्यात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून महामार्गावर सुरु असलेल्या अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक अपघात होत आहेत. नुकताच आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास मलकापूर येथे झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती जरी आली असली तरी यातील मृताचा आकडा वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील लक्ष्मी नगर जवळील उड्डाणपुलावर आज सकाळी 3 वाजे दरम्यान दोन लक्झरी बसेसच्या झालेल्या भीषण अपघातात 6 जण ठार तर 22 जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघाताचे फोटो अंगावर शहारे आणणारे आहेत.
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव परिसरातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या खासगी बसला मलकापूर जवळ शनिवारी ता.29 पहाटे झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले असून 22 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर मयतांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत.