जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२३
राज्यातील अल्पवयीन मुलीसह महिलांसोबत चुकीचे कृत्य होत असल्याच्या अनेक घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना मुंबई मधील वांद्रे शहरात घडली आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक देखील केली आहे.
काय आहे घटना
वांद्रे येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये सोमवारी पश्चिम उपनगरातील रहिवासी व पिडीत १३ वर्षीय मुलगी ही तिच्या परिवारासह जेवणासाठी कोबे सीझलर्स या हॉटेलमध्ये आली असता. तेथील एक वेटर तिच्याकडे टक लावून पाहत होता, त्यानंतर त्याने तिला डोळा मारला. एवढेच नव्हे तर त्याची हिंमत इतकी वाढली की त्याने त्याचा मोबाईल नंबर लिहीलेला एक कागद तिच्या दिशेने फेकला आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्शही केला, असे पोलिसांनी सांगितले. यामुळे ती मुलगी घाबरली व तिने हा संपूर्ण प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला.
अलपवयीन मुलीच्या पालकांना वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शाहबाद खान (वय 19) असे आरोपी वेटरचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे. मात्र सध्या तो मुंबईतील हॉटेलमध्ये काम करत असून तेथेच राहतो. अलपवयीन मुलीच्या पालकांना वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शाहबाद खान (वय 19) असे आरोपी वेटरचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे. मात्र सध्या तो मुंबईतील हॉटेलमध्ये काम करत असून तेथेच राहतो.