जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
देशासह राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही महिन्यापासून अत्याचाराच्या संतापजनक घटना घडत आहे. यावर प्रशासन कारवाई देखील होत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मोर्चे देखील निघाले आहे. मात्र या प्रवृत्तीला कुठे तरी थांबा मिळावा यासाठी शॉर्ट फिल्मद्वारे समाजात जनजागृती व्हावी यासाठी जळगाव शहरातील ईश्वर हिरे या तरुणाने “निर्भय” या नावाने शॉर्ट फिल्म बनविली असून या फिल्मला काही तासातच सोशल मिडीयावर मोठा प्रतीसाद मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारतात स्त्रियांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढतच चाललेले आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडत आहे. लहान मुली, स्त्रियांवर अजूनही अत्याचार होत आहे. आणि कत्येक स्त्रियांचे बळी जाताहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महिलांना त्यांचे स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे. व महिला कुठेतरी सक्षम झाल्या पाहिजे म्हणून आमचा छोटासा प्रयत्न “निर्भय” या शॉर्ट फिल्मद्वारे आम्ही केले आहे. या ” निर्भय” शॉर्टफिल्म साठी जळगाव मधील स्थानिक कलावंतांनी मेहनत घेतलेली आहे.
कलावंतांची नवे – ईश्वर हिरे, सुभाष गोपाळ, अक्षय दुबे, संदीप तायडे, नितीन तायडे, प्रशांत भांबरे, हर्षल सुरवाडे, भावेश भांडारकर, धंनजय निकम, सुमित धवलपुरे, हर्षल माळी, मीनल भालेराव, पलक सोनी, इशिका घोडेस्वार
हा व्हिडीओ तुम्हाला @cineishwar या इन्स्टाग्राम पेजवर बघायला मिळेल.