जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२४
वांद्रे येथील आयशा मनोर इमारतीच्या सातव्या मजल्यावरून अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेह बाबा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
मलायकाला वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ती पुण्यात होती. माहिती मिळताच तिने तातडीने मुंबई गाठली. मलायकाच्या जवळच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, अनिल अरोरा यांनी आत्महत्या केलेली नाही, हा अपघात आहे, याचा खुलासा पोलिसांच्या पंचनामा करण्यात येईल.
अनिल यांची पत्नी आणि मलायकाची आई जॉयस यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, अनिल रोज सकाळी बाल्कनीत बसून वर्तमानपत्र वाचत असे. बुधवारी सकाळी दिवाणखान्यात अनिल यांची चप्पल पाहिल्यानंतर ती बाल्कनीत गेली. अनिल कुठेच दिसले नाही तेव्हा त्यांनी खाली पाहिले. पहारेकरी मदतीसाठी जोरजोरात ओरडत होता. अनिल कोणत्याही आजाराने ग्रस्त नसल्याचे जॉयस यांनी सांगितले. त्यांना फक्त गुडघ्यात दुखत होते. त्यांनी मर्चंट नेव्हीकडून व्हीआरएस घेतले होते. जॉयसने असेही सांगितले की तिचा आणि अनिलचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता पण दोघेही काही वर्षांपासून एकत्र राहत होते.