जळगाव मिरर | २२ जुलै २०२४
खासगी व्हिडीओ व्हायरल करुन एका २० वर्षांच्या तरुणीची तिच्याच प्रियकराने बदनामी केल्याचा प्रकार मरिनड्राईव्ह परिसरात घडली असून याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी तौहीफ जमीर शरीफ याच्याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही मूळची कर्नाटकची रहिवाशी असून ती गेल्या दोन वर्षांपासून तिच्या आजीकडे मरिनड्राईव्ह येथे राहते. तिचे तौहीफसोबत प्रेमसंबंध होते, मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाला तिच्या कुटुंबियांचा विरोध असल्याने त्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी तिच्या आजीकडे पाठविले होते. ती सध्या चर्नीरोडच्या एका महाविद्यालयात शिकत असून अंधेरी येथे एअर हॉस्टेलचे प्रशिक्षण घेत आहे. जानेवारी महिन्यांत तिची तौहिफशी भेट झाली. यावेळी त्यांच्यात संमतीने शारीरिक संबंध आले.
या संबंधाचे त्याने त्याच्या मोबाईवरुन काही व्हिडीओ आणि फोटो काढले. जून महिन्यांत तिच्या चारित्र्यावरुन तौहीफने तिच्याशी वाद घालून तिला बेदम मारहाण केला. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर तिने त्याच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून त्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या आईसह नातेवाईकांना पाठवून तिची बदनामीचा प्रयत्न केला. हा प्रकार तिला तिच्या आईकडून समजताच प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार आझाद मैदान पोलिसांना सांगून तिथे तौहीफविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तौहीफ हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.