
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील गांधली येथे जेसीबी मशीनने पिण्याच्या पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असताना पुरातन काळातील भांडी आढळून आली. त्यामुळे काम तूर्त थांबवले आहे. तर गांधली गाव हे पूर्वीची मोठी बाजारपेठ आणि येथे भुईकोट किल्ला होता. त्यामुळे ही पुरातन भांडी इतिहास संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहेत.
अमळनेर तालुक्यातील गांधली येथे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. बौद्ध वाड्यात जेसीबी मशीनने पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू असताना अचानक भांड्यांचा आवाज आला. काम थांबवून पाहणी केली. त्यात विविध भांडी आढळून आली. तर यात काही भांडी तुटली. या गावाला मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महराजानी सुरतेवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी दोन टोळ्या बनवल्या होत्या. धरणगाव येथे थांबल्यानन्तर त्यांनी एक टोळी बऱ्हाणपूर दिशेने जात आहे असे दर्शवले होते. धरणगाव नंतर गांधली येथे महाराज थांबले होते. याठिकाणी भुईकोट किल्ला होता. गावाला साडे चार किमीची तटबंदी होती.





















