जळगाव मिरर / ३१ जानेवारी २०२३
जळगाव शहरात विविध समाजातर्फे भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन होत असते. तसेच सुवर्णकार समाजातर्फे ही दरवर्षाप्रमाणे यंदा चौथ्या पर्वांचे आयोजन दि.28 व 29 जानेवारी रोजी शहरातील शिवतिर्थ मैदानावर करण्यात आले होते. यंदाच्या सामन्यात ए.एस.सुपरकिंग संघाने यंदा बाजी मारली आहे.
दरवर्षाप्रमाणे यंदाही जळगाव शहरातील शिवतिर्थ मैदानावर सुवर्णकार समाजातर्फे चौथ्या वर्षाच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. यंदाचे सामने दोन दिवसीय असल्याने मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी होती. यंदाचे विजेतेपद हे अश्विन सोनार यांच्या मालकीचा संघ ए.एस.सुपरकिंगने बाजी मारली तर उपविजेते पद मातोश्री रायडर्स संघ जिंकला.
मनपा नगरसेविका रंजनाताई वानखेडे, भाजपा मंडल ३ चे अध्यक्ष विजयशेठ वानखेडे, संजयशेठ विसपुते, अशोकशेठ विसपुते, रमेशशेठ वाघ, संजयजी पगार, विजयजी मोरे, मिलिंदजी विसपुते, भगवान दुसाने यांच्यासह समाजातील आदी मान्यवर उपस्थित होते. या क्रिकेट सामन्याचे आयोजन अश्विन सोनार, पियुष वानखेडे , दिपक इखनकर, विनायक दुसाने यांनी केले होते.