अमळनेर : विक्की उत्तम जाधव
विसाव्या शतकाच्या आरंभीची मराठी कविता अभ्यासतांना आपल्याला बहिणाबाई चौधरी या कवयत्रीला विसरून चालणार नाही. आधुनिक मराठी कवितेच्या प्रांतातील बहुतेक सर्वच कवी विद्वान, व्यासंगी होते. पण बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या. तरीही त्यांनी रचलेले काव्य वाचल्यावर एखादा जाणता, शिकलेला आणि चार ठिकाणी फिरून अनुभव घेतलेला कवी असावा असं वाटतं.त्यांनी आपल्या कविता ठरवून रचल्या नाही .त्यांच्या कवितेतून त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले असे अमळनेरलाविद्रोही साहित्य संमेलन आयोजन समिती आणि युवा कल्याण प्रतिष्ठान.आयोजित धनदाई महाविद्यालयात कवियत्री बहीणाबाई चौधरी जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा.डॉ लिलाधर पाटील बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे,प्रा.डॉ लिलाधर पाटील तर अध्यक्षस्थानी युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.अशोक पवार होते.अगोदर मान्यवरांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पुजन केले. प्रा.डॉ लिलाधर पाटील म्हणाले कि, बहीणाबाई यांनी आपले काम हेच देवाचे रूप आहे असे सांगितले. बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादा पेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही, कि कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानचे वेगळेपण आहे असे सांगितले.
खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ वसुंधरा लांडगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि त्यांनी जे सोसलं त्यांनी कवितेतेतून व्यक्त केले. बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही, हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही, नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही असे सांगत बहीणाबाई चौधरी यांना अगदी तरुणपणी वैधव्य आल्यावरही खचून न जाता धीराने ह्या परिस्थितीला बहिणाबाई सामो-या गेल्या. माझी कीव करू नका असं त्या आजूबाजूच्या बायकांना सांगतात.
” नका नका आया बाया
नका करू माझी कीव
झालं माझं समाधान
आता माझा माले जीव ”
अशा विविध कविता गायन करत कवियत्री बहीणाबाई चौधरी यांच्या आठवणी जिवंत केल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डि.ए.पाटील यांनी केले. प्रा.डॉ मानिक बागले यांनी सांगितले कि मराठी साहित्यात ज्या मोजक्या स्त्री साहित्यिकांनी दर्जेदार साहित्यनिर्मिती केली आहे, त्यापैकीच एक असणा-या बहिणाबाई चौधरी. पण अशिक्षित असूनही जे साहित्य त्यांनी निर्माण केले त्याला खरोखरच तोड नाही आणि हे जाणून घेण्याकरता तरी एकदा का होईना बहिणाबाईच्या काव्याचा आस्वाद घेतला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमात डि.ए.पाटील, बापूराव ठाकरे, डि.ए.सोनवणे,सौ रेखा मराठे,प्रेमराज पवार, अजय भामरे यांनी कवियत्री बहीणाबाई चौधरी यांच्या कविता सादर केल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रा.अशोक पवार म्हणाले की बहीणाबाई चौधरी यांच्या कवितेतील तत्वज्ञानाचे जीवनात आचरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमात मा.गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे,मा.केद्रप्रमुख बन्सीलाल भागवत,अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा चंद्रकांत जगदाळे,प्रा.उल्हास मोरे,मनोहर पाटील,पत्रकार संजय सुर्यवंशी, ईश्वर महाजन, निरंजन पेंढारे,सोपान भवरे,अरूण देशमुख, चेतन सोनार, अशोक पाटीलसह अनेक श्रोते उपस्थित होते. व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ माणिक बागले यांनी केले तर आभार बापूराव ठाकरे यांनी मानले.