जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३
दिनांक १९ फेब्रृवारी रविवार रोजी रायसोनी नगरातील रहवासीचे लहानमुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमीत्त शोभायात्रेचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते.
शोभायात्रेत लाठीकाठी, तलवार बाजी, आणि लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष हेरून घेतले. सातवी, आठवी, नववीचे लहान मुली जेव्हा काडी फिरवायचे तर मोठी मुलसुद्धा स्तब्द्ध झाले.
यावेळी म न पा माजी सभापती तथा नगरसेवक जितेंद्र मराठे, माजी नगरसेवक किशोर भोसले, मंगला ताई बारी, राकेश लोहार, निलेश भावसार हे प्रशांत चौधरी प्रमुख उपस्थीत होते.
मुलामुलींना छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कारीक श्लोक, ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषात मिरवणूकिची सुरवात करण्यात आली यावेळी कपील ठाकूर, विजय कासार, समस्थ शिवप्रतीष्ठाण हिंदुस्थानचे धारकरी उपस्थीत होते.
मिरवणूक मार्गावर रांगोळी काढण्यासाठी निशा जाधव, शुभांगी चौधरी, हर्षाली जाधव, वैष्णवी चौधरी, कोमल वाणी या सर्व भगीनींनी स्वत:हून पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन सुरज दायमा, प्रविण पाटिल, दीपक पाटील यांनी केले आणि मोहन कुलकर्णी, समिर कुलकर्णी, वैभव जोशी, गौरव जोशी, जयेश महाजन, गौरव चौधरी, हितेश अहिरे, शुभम चौधरी, रोहन चौधरी, रुपेश पाटील, भूषण चव्हाण, सोहम जाधव, ऋषिकेश वरुडकर, आदित्य मोरे….. यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.
