जळगाव मिरर | १८ जुलै २०२४
राज्यातील अनेक शहरात पाऊस जोरदार सुरु असल्याने अनेक नदी तुडुंब भरून वाहत आहे. तर दुसरीकडे राज्यातील उच्चशिक्षित तरुण, तरुणी चुकीचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवीत असल्याच्या घटनेत नियमित वाढ होत आहे. नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एमबीबीएसची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणीने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पहिल्यांदा वाचल्यानंतर पुन्हा वैनगंगा नदीच्या खोल पाण्यात उडी घेऊन या तरुणीने आयुष्य संपवले. ईशा घनश्याम बिजवे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेचे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील ‘एमबीबीएस’ पदवीधर तरुणीने वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीने प्रथम नदीत उडी घेतली. पाणी कमी असल्याने ती बचावली, मात्र पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, ईशा घनश्याम बिजवे ही ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहे. डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची ती मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र एकदा बचावल्यानंतरही तिने पुन्हा उडी घेतल्याने आत्महत्या करण्याच्या निश्चयानेच ती आलेली होती असे बोलले जात आहे.
इशा दुचाकी घेऊन पोहोचली. चप्पल दुचाकीवर ठेऊन तिने नदीत उडी घेतली. यावेळी तिने उडी घेताच पुलावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तिच्या मृतदेहाचे शोध घेतला जात होता. मात्र शोध मोहिमेनंतर तिचा मृतदेह आढळून आला. मात्र एका उच्च शिक्षित तरुणीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे.
त्यातच नदीच्या पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन- चालकांनी मृत्यूचा थरारक व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. तिने उडी मारली आहे अशी चर्चा लोकांमध्ये सुरू होती. मात्र, तिला वाचवण्यासाठी कुणीही धावले नाही. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह बाहेर काढला.