अमळनेर : विक्की उत्तम जाधव
राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने यंदाच्य महिला दिनानिमित महिलांसाठी राज्यातील ‘महिला सन्मान योजना’ जाहीर केली होती. त्यामुळे राज्यातील महिलांना कुठल्याही गावी प्रवास करण्यासाठी आता बसमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना आज शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.
सध्या १२ वर्षांखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ महिलांना १०० टक्के सवलत दिली जाते. नव्या योजनेमुळे १६-१७ लाख महिला प्रवाशांपैकी दररोज १२-१३ लाख महिला प्रवाशांना ५० टक्के तिकीट सवलतीचा फायदा होईल.
आज पासून राज्य परिवहन महामंडळतर्फे सर्व महिला प्रवासी भगिनिंसाठी महिला सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेत सर्व महिला प्रवासी भगिनींना तिकीट दरात ५०% सवलत देण्यात आलेली आहे तरी अमळनेर आगाराच्या वतीने सर्व महिला भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या लाडक्या लाल परीने सुरक्षित व सवलतीच्या दरात प्रवास करावा.
आगार व्यवस्थापक, रा. प. अमळनेर आगार