जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२४
गेल्या वर्षापासून राज्यात मनोज जरांगे पाटील सातत्याने मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सातत्याने सरकारला जाब विचारत आहे मात्र त्यांना अद्याप सरकारने न्याय न दिल्याने राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आता मनोज जरांगे पाटलांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या असल्याचे वृत्त असून त्यासाठी जळगाव शहर मनपाचे माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे यांनी देखील मनोज जरांगे पाटलांची भेट घेवून चर्चा केली असल्याचे समजते आहे.
मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे – पाटील यांची नुकतीच जळगाव शहरातील पिंप्राळा येथील भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे यांनी भेट घेत आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिका सांगितली असल्याचे देखील समजत आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचा आढावा या माध्यमातून घेतला असल्याची विश्वसनी माहिती समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे देखील मराठा समाजाचे उमेदवारांना उभे करून महायुतीला जोरदार टक्कर देणार आहे. त्यानुसार जागे पाटील यांच्याकडून राज्यातील विविध जिल्ह्यातील मराठा समाजाच्या नेते व पदाधिकारी यांच्याकडून जिल्ह्याचा आढावा घेतला जात आहे. जळगाव शहर व पिंप्राळा परिसरातील १५० ते २०० सहकाऱ्यांसह चंद्रकांत कापसे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. चंद्रकांत कापसे हे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक असून त्यांचे सुपुत्र मयूर कापसे हे देखील भाजपचेच माजी नगरसेवक आहे. मराठा समाजातील चांगला चेहरा तसेच दांडगा जनसंपर्क असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या कडून विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदार संघातून उभे राहणार असल्याची एकच चर्चा सुरू आहे.