जळगाव मिरर | २६ जुलै २०२४
शहरातील आकाशवाणी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २५ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी नागरीकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार (वय ६९, रा. अक्सा नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, महाबळकडून जळगाव शहरात शेख रऊफ शेख अब्दुल्ला बेलदार हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडी २७५१) ने जात असतांना पाळधीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ७६४२) ने आकाशवाणी चौकात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २५ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक ताब्यात घेतला आहे. तर खासगी वाहनाने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं असा परिवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.