
जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२४
देशातील भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली असून त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलय. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. मागच्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. याआधी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
याआधी आडवाणींना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 जुलैला लालकृष्ण आडवाणींना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी 26 जूनला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांची एक छोटीशी सर्जरी झाली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.