जळगाव मिरर | १८ जुलै २०२४
देशात गेल्या काही वर्षापासून रेल्वे अपघाताच्या छोट्या मोठ्या घटना घडत नुकतेच उत्तर प्रदेशातून रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. हि घटना गोंडा येथे दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ट्रेनच्या 15 बोगी रुळावरून घसरल्या असून त्यापैकी 4 बोगी उलटल्या आहेत. या अपघातात आतापर्यंत दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, 20-25 प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य सुरू झाले आहे. ट्रेन चंदीगडहून येत होती. झिलाही रेल्वे स्थानकादरम्यान गोसाई दिहवा येथे हा अपघात झाला. दिब्रुगड एक्स्प्रेस (15904) चंदीगडहून दिब्रुगडपर्यंत धावते. गुरुवारी ही ट्रेन चंदीगडहून रात्री 11.39 वाजता निघाली. गुरुवारी दुपारी ही गाडी गोंडा आणि बस्ती दरम्यान झिलाही स्थानकावर आली. तेव्हा गाडी रुळावरुन घसरली. यानंतर रेल्वेच्या बोगी उलटल्या. सीएम योगी यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.